आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत चक्क पोलिस स्टेशनमध्येच साजरा झाला तक्रारदार सॉफ्टवेअर इंजिनिअरचा बर्थडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बायकोसोबत फिरायला गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरवर दुर्दैवाने साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये स्वत:चा वाढदिवस साजरा करण्‍याची वेळ आली.  विशेष म्हणजे पोलिसांनीच त्याचा बर्थडे साजरा केला. अनिश जैन (28) असे या तरुणाचे नाव असून तो मुंबईतील रहीवासी आहे.

झाले असे की, अनिश जैनचा परवा (शविवार) वाढदिवस होता. तो बायकोसोबत फिरायला निघाला होता. दोघांनी घाटकोपरमध्ये सिनेमाला जाण्याचा प्लॅन केला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास अनिशने कार साकीनाक्याजवळ सिग्नलला थांबवली असता एका टेम्पोने त्यांना मागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र त्याच्या कारचे मोठे नुकसान झाले.

वाहन विम्यासाठी दावा करायचा असल्यास कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे अनिशला माहीत होते. त्यामुळे टेम्पो चालकासह अनिश जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार करण्यासाठी दाखल झाला. पोलिसांनी टेम्पो आणि कारची पाहणी केली आणि घटनेची माहिती जाणून घेतली. ही लेखी प्रक्रिया असल्यामुळे अनिषचे किमान दोन तास गेले. बोलता-बोलता, माझा वाढदिवस पोलिस स्टेशनमध्ये घालवेन, असे कधी वाटले नव्हते’ असे अनिश म्हणाला.

हे पोलिसांनी ऐकले. त्यांनी लगेच मिठाई मागवली आणि वाटली. कारच्या अपघातामुळे मनावरील तणाव निवळल्याचे अनिशने सांगितले. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन हा फोटो शेअरही केला आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...तक्रारदार सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पोलिस स्टेशनमध्ये असा साजरा झाला बर्थडे...
बातम्या आणखी आहेत...