आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Student Suicide At Mumbai For Raging

रॅगिंगला कंटाळून मुंबईत विद्यार्थ्याची आत्महत्या; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दोन महिन्यांपासून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण रेल्वेस्थानकाजवळ घडली. नितीन पाडाळकर (वय 19) असे मृताचे नाव आहे. नितीन हा नवी मुंबईतील रामराव आदिक अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनच्या दुसर्‍या वर्षात शिकत होता. गेल्या दोन महिन्यांपासून महाविद्यालयातील विद्यार्थी त्याची रॅगिंग करत होते. शनिवारी संध्याकाळी मित्रांना भेटण्यास जात असल्याचे त्याने घरी सांगितले. त्यानंतर त्याने कल्याण रेल्वेस्थानकावर भरधाव वेगाने येत असलेल्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

नितीन पडळकर याच्या आत्महत्येप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव मढवी आणि प्रदीप पाईपकर असे आरोपींची नावे आहे. नितीनला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दोन्ही विद्यार्थी नोव्हेंबर 2012पासून नितीनला त्रास देत असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. नितीनने वेळोवेळी सर्व गोष्टी आई-वडील आणि बहिणीला सांगितल्या होत्या. अखेर रॅगिंगलाच कंटाळून नितीनने आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

नितीनकडे आढळून आलेल्या एका चिठ्ठी्त संबंधित विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांना रामराव आदिक अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे.