आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टोक्सच्या चेंडूंत विकेट; इंग्लंडची बांगलादेशवर मात; शब्बीर रहेमानचे अर्धशतक व्यर्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चितगाव- इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेन स्टोक्सने चेंडूंत गडी बाद करून रोमांचक सामन्यांत यजमान बांगलादेशविरुद्ध इंग्लंडला िवजय मिळवून दिला. स्टोक्सने सामन्यात गडी बाद केले. याशिवाय दुसऱ्या डावात त्याने ८५ धावा काढल्या. स्टोक्सच मॅन ऑफ मॅच ठरला. मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना येत्या २८ ऑक्टोबरपासून ढाका येथे सुरू होईल.

इंग्लंडने चौथ्या डावात बांगलादेशसमोर विजयासाठी २८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यजमान संघाला पाचव्या दिवशी विजयासाठी ३३ धावांची, तर इंग्लंडला विकेटची गरज होती. बांगलादेशला २६३ धावांवर रोखून इंग्लंडने २२ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने रविवारी बाद २५३ धावा काढल्या होत्या.

सोमवारी शब्बीर रहेमान (नाबाद ६४) आणि ताजूल इस्लाम (१६) यांनी सुरुवात केली. शब्बीर खेळपट्टीवर असल्यामुळे बांगलादेश विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र, ८२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्टोक्सने ताजूलविरुद्ध पायचीतचे अपील केले. पंचांनी हे अपील फेटाळले. इंग्लंडने यावर रिव्ह्यू मागितले. यात इंग्लंडला यश मिळाले. एका चेंडूनंतर स्टोक्सने शफिऊल इस्लामला पायचीत केले. या विकेटने इंग्लंडचा विजय निश्चित केला.

संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड: २९३ आणि २४०. बांगलादेश : २४८ २६३.
बातम्या आणखी आहेत...