आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपुरा पाऊस, तरीही राज्यातील धरणांत 52 टक्के पाणीसाठा; जूनपर्यंत टंचाई भासणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मान्सूनच्या अागमनापासून ते अाजपर्यंत राज्याच्या अर्ध्या भागात पावसाने अत्यल्प हजेरी लावली अाहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यभरात सगळी जाेरदार पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले अाहे. परंतु तरीही राज्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठा ५२ टक्के असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे पाणी असून जून २०१८ पर्यंत काेणतीही अडचण येणार नाही, असे जलसंपदा  विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.   
 
संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याचा साठा ५२ टक्के असून गेल्या वर्षी अाजच्या तारखेला ताे ६२ टक्के हाेता. या वर्षी पाण्याच्या साठ्यात दहा टक्के घट झालेली अाहे. मांजरा अाणि तेरणामध्ये पाणी साठा कमी असून जायकवाडी धरणात पाण्याचा चांगला साठा अाहे. त्याचप्रमाणे काेकण, नाशिक, पुणे विभागात जलाशयांची स्थिती चांगली असली तरी मराठवाडा, अमरावती, नागपूरमध्ये पाण्याची समाधानकारक स्थिती नाही.  काही ठिकाणी थाेडेफार, तर काही ठिकाणी अजिबात पाण्याचा साठा नाही अशी स्थिती अाहे. पण त्यामुळे राज्यात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, असे म्हणता येणार नाही. पिण्याचे पाणी जून २०१८ पर्यंत पुरेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.  

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य : पाऊस हव्या त्या प्रमाणात झाला नाही तर मात्र काही भागात विशेषकरून मराठवाड्यात पाण्याची समस्या निर्माण हाेऊ शकते. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला अाहे. त्यामुळे अाॅगस्टअखेरपर्यंत पाण्याचा साठा ७२ टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
बातम्या आणखी आहेत...