आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'शाई पुसा, दोनदा मतदान करा', पवारांच्या वक्तव्याची न्यायालयीन चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शाई पुसा आणि दोनदा मतदान करा,’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने सोमवारी दिले.

चंदूलाल मुलाणी यांनी याबाबत तक्रार केली हाेती. त्यावर पोलिसांनी केलेली चौकशी पुरेशी नसल्याने न्यायालयीन चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले. २७ रोजीच्या या निर्देशांची प्रत सोमवारी उपलब्ध झाली.

असे होते वक्तव्य
‘लोकसभेसाठी राज्यात तीन टप्प्यात मतदान आहे. आधी गावी मतदान करून या, नंतर मुंबईतही मतदान करा. बोटावरील शाई पुसायला मात्र विसरु नका,’
(मुंबईत माथाडी कामगार मेळाव्यात)