आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ester Anuhaya Found On That Day With One Man In Cctv Footage

अनुयाच्या हत्येचे गूढ वाढले, सीसीटीव्हीत तिच्यासोबत पुरूष आढळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हैदराबादची 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्टर अनुया हिच्या हत्येचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 4 जानेवारीच्या सकाळी कुर्ला रेल्वे टर्मिनसमधील फलाट क्रमांक 5 वर अनुयासोबत एक व्यक्ती असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. अंदाजे 40 वर्षवयोगटातील एक व्यक्ती अनुयाची बॅग घेऊन तिच्यासोबत चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी तो व्यक्ती कोण यावर चौकशी केंद्रित केली आहे.
4 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या ईस्टर अनुया या सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीचा 16 जानेवारी रोजी सायंकाळी ईस्टर्न एक्स्प्रेस वेजवळील मिठागारात सापडला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता व तो जाळून टाकण्यात आला होता. अनुह्या आपल्या मूळगावी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथे नाताळाच्या सुटीसाठी गेली होती. मात्र सुटीवरून परतत असताना कुर्ला स्थानकात उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. लुटमार करून तिची कोणी हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त करीत त्या दिशेने तपास सुरू केला होता. मात्र आता सीसीटीव्हीत तिच्यासोबत एक इसम तिची बॅग हातात घेऊन जाताना दिसत आहे. त्यामुळे अनुयाच्या हत्येला तो इसमच जबाबदार असला पाहिजे असे आता पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या इसमाला शोधण्याची मोहिम सुरु केली आहे.
पुढे वाचा, डिसेंबरपासून तिच्या वागण्यात झाला होता बदल...