आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Etihad Airways Denies Allegations Leveled By Rahat Fateh Ali Khan

राहतला भारतात येण्याच्या नियमांची माहिती दिली होती-इत्तेहाद एअरवेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तीन दिवसांपूर्वी हैदराबादेतून अबुधाबी येथे माघारी पाठवण्यात आलेला पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याला भारतात दाखल होण्यासंबंधीच्या नियमांची माहिती देण्यात आली होती, अशी स्पष्टोक्ती गल्फ करिअर इत्तेहाद एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
सरत्या वर्षाला निराेप देण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी अायाेजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहत अबुधाबीहून थेट हैदराबाद विमानतळावर दाखल झाला होता. मात्र, पाकिस्तानी नागरिकाला हैदराबाद येथे दाखल होण्यासाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता किंवा चेन्नई येथूनच यावे लागते, असा भारतीय विमान प्राधिकरणचा नियम आहे. मात्र, राहत हा थेट हैदराबादला दाखल झाला. त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला हैदराबादला उतरण्याची परवागनी नाकारत परत अबुधाबीला पाठवले. त्यानंतर राहत दिल्लीमार्गे हैदराबादेत दाखल झाला. दरम्यान, या सर्व घटनेला इत्तेहाद एअरवेज जबाबदार असल्याचे राहतने म्हटले आहे.