आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स स्कँडलसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वच लॉजवर सीसीटीव्हीचा प्रस्ताव : गृहमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लॉजवर होणार्‍या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातील, विशेषत: ग्रामीण भागातील सर्वच लॉजवर सीसीटीव्ही लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. लॉजवर होणार्‍या गैरप्रकारांबाबत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात चर्चा घडवून आणली. या वेळी अनधिकृत आणि अधिकृत सर्वच लॉजवर लक्ष ठेवून कारवाई केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील सेक्स स्कँडल प्रकरणी कोणती कारवाई केली अशी विचारणा करीत एकनाथ खडसे यांनी सरकारवर तोफ डागण्याचा प्रयत्न केला. सटाणा येथे उघडकीस आलेल्या अश्लील चित्रफीत प्रकरणात कोणाचा सहभाग होता, हे स्पष्ट करा, तो आरोपी कोणत्या पक्षाचा होता, अशी विचारणा बाळा नांदगावकर यांनी केली. याला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले की, तो आरोपी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचा होता, मात्र असे असेल तर आपल्या पक्षातील लोकांची कुंडली काढली तर ती मोठी होईल, असेही प्रत्युत्तर त्यांनी दिले. यापुढे राज्यातील परवानगी असलेल्या आणि नसलेल्या सर्वच लॉजची चौकशी होईल, जिथे असे गैरप्रकार आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
गुंडांना हद्दपारी; गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का
गुन्हेगारी जगत : लूटमारीने जनता त्रस्त; गुन्हेगार मस्त, यंत्रणा सुस्त
सुशिक्षित मुलींत वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती(विशेष)