आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडुलकर, शरद पवार, फडणवीस यांच्याकडून प्रणवचे तोंडभरून कौतूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याणच्या 15 वर्षीय प्रणव धनावडे या युवा क्रिकेटरने आज नाबाद 1009 धावा करीत अनोखा विश्वविक्रम स्थापन केल्यानंतर त्याचे सर्वच स्तरातून तोंडभरून कौतूक होत आहे. क्रिकेटचा देव अशी उपमा दिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह एमसीए अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रणवच्या कामगिरीमुळे अभिनंदन करीत शाबासकी दिली आहे.
एकाच डावात 1000 हून अधिक धावा त्याही नाबाद केल्याने सचिन तेंडुलकरने प्रणवचे मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. कठोर मेहनत घेऊन यशाची शिखरे अशीच पादाक्रांत कर, अशा शब्दांत शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.
एमसीएचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रणवचे अभिनंदन केले आहे. आंतरशालेय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणा-या प्रणवचे खास अभिनंदन असे पवारांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
प्रणव धनावडेच्या रूपाने राज्यात एक नवीन सितारा समोर आला आहे. प्रणवने 117 वर्षांचा रेकॉर्ड तोडला. महाराष्ट्रात असा सितारा आहे याचा मला व महाराष्ट्राला सार्थ आभिमान आहे. प्रणव भविष्यात देशाचे नाव जगभर गाजवेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत प्रणवला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 1009 धावांचा विश्वविक्रम रचणा-या प्रणव धनावडेचं मनःपूर्वक अभिनंदन अशा शुभेच्छा राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. याबरोबरच मुंबई व ठाणे परिसरातील अनेक राजकीय नेते, आमदार, खासदार यांनी प्रणवचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
देशातील माजी क्रिकेटर, क्रिकेटर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटपट्टूंनी मुंबईकर प्रणवचे कौतूक केले आहे. मुंबईकर खेळाडू नेहमीच चमकदार कामगिरीसाठी ओळखले जातात अशा शब्दांत प्रणवचे कौतूक केले आहे.
प्रणवच्या प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार- विनोद तावडेंची घोषणा
प्रणव यांच्या कामगिरीची दखल राज्य सरकारने घेतली. प्रणवची कामगिरी उंचावण्यासाठी त्याला मदत म्हणून राज्य सरकारने त्याच्या उर्वरित शिक्षणाची व क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार घेईल अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. तावडेंनी प्रणवचे अभिनंदन केले आहे.
मनसेकडून 26 जानेवारीला सत्कार, 1,09000 हजार रूपये बक्षिस देणार-
कल्याण-डोंबिवली शहर मनसेकडून प्रणव धनावडे याचा येत्या 26 जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे. 1009 धावा केल्याबद्दल मनसेचे नेते राजू पाटील यांच्याकडून प्रणव याला 109000 रूपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका करणार भव्य नागरी सत्कार-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विश्वविक्रम रचणा-या प्रणव धनावडेचा भव्य नागरी सत्कार करणार असल्याचे शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले. ठाणे जिल्हा शिवसेनेकडून प्रणव याला 1 लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले गेले आहे.
पुढे वाचा व पाहा, आजच्या सामन्याचा स्कोर बोर्ड...
प्रणवचा पराक्रम पाहायला आई-वडिल मैदानात होते हजर...
बातम्या आणखी आहेत...