आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Every Problems Answering By Police Not Correct ; Leader To Be Introspect : R R Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोणत्याही समस्येचे उत्तर पोलिसांना मागणे चुकीचे ; नेत्यांनी अंतर्मुख व्हावे : आर .आर .पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील कोणत्याही समस्येचे उत्तर पोलिसांकडे मागणे चुकीचे असून वाढत्या जातीय दंगली आणि दलितांवरील अत्याचारांबाबत राजकीय नेत्यांनी अंतर्मुख होण्याची वेळ आली असल्याचे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत व्यक्त केले. दिवाकर रावते, विनोद तावडे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत 260 अन्वये प्रस्ताव मांडला होता. त्याला उत्तर देताना आर. आर. बोलत होते.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा विरोधकांचा आरोप आर. आर. पाटील यांनी फेटाळूल लावला. राज्य पोलिस दलातील 63 हजार पदे रिक्त आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या सुरक्षेची पोलिस योग्य ती काळजी वाहत असल्याचे आर. आर. म्हणाले.

गेल्यावर्षी राज्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली 1 हजार 90 गुन्हे नोंद झाले आहेत. जाती व्यवस्था संपल्याशिवाय दलितांवरील अत्याचार कसे थांबणार, असा प्रश्न उपस्थित करून इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात दलितांवरील अत्याचार अल्प असल्याचा दावा आर. आर. यांनी केला. गेल्यावर्षी महिला अत्याचारांचे 17 हजार 209 गुन्हे नोंद झाले असल्याची माहिती देऊन महिला अत्याचारांमध्ये वाढ झाल्याची कबुली त्यांनी सभागृहात दिली.

मुंबई पोलिसांचे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचे मॉडेल इतर शहरांमध्ये लवकरच लागू करण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. पळवलेली मुले शोधली, मात्र सापडलेल्या मुलांची नोंद न केल्यामुळे गायब बालकांचा आकडा फुगल्याचा दावा त्यांनी केला. साक्षीदार फितूर होत असल्याने गुन्हेगारांना दोषी ठरवण्यात अपयश येत असल्याचे ते म्हणाले. डान्स बार प्रकरणी 125 पोलिस निरिक्षकांना सक्त ताकीद देण्यात आली असून 14 अधिका-यांवर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

सीसीटीव्ही पुरवण्याबाबत 627 कोटींची साई इन्फोसीस कंपनीची निवीदा मंजूर करण्यात आली असून 5 हजार बुलेटफ्रुप जॅकेट खरेदीच्या निविदेचे काम अंतीम टप्प्यात असल्याची माहिती पाटील यांनी दिली. दोन दिवस चाललेल्या या चर्चेमध्ये कपिल पाटील, रमेश शेंडगे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, जयंत जाधव यांनी भाग घेतला.

पोलिसांबद्दल खोटा कळवळा
मुंबईत आझाद मैदानावर पोलिसांना मारहाण झाल्याबाबत ओरड करणारे लोकप्रतिनिधी विधिमंडळाच्या लॉबीत पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण होऊन गप्प कसे काय बसले, असा प्रश्न गृहमंत्र्यांनी उपस्थित केला. या लोकप्रतिनिधींच्या गप्प राहण्यावरून पोलिसांबाबत त्यांना वाटत असणारा कळवळा खोटा असल्याचा आरोपही आर. आर. पाटील यांनी या चर्चेदरम्यान केला.


दलित अत्याचार
20111334
20121090
आदिवासी अत्याचार
2011322
2012313
महिला अत्याचार
201217209
201217447
मंगळसूत्र चोरी
20114867
20124251