आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्यूटीवर दरवर्षी 120 पोलिसांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात 65 हजार पोलिसांची महाभरती करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी बदलत्या जीवनशैलीमुळे कर्तव्यावर असताना 120 पोलिसांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब माहिती कायद्यांतर्गत उघडकीस आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी याबाबत माहिती मागवली होती. यानुसार 2002 ते 2012 या कालावधीत प्रकृतीविषयक बाबींमुळे सुमारे 1 हजार 341 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक 98 टक्के मृत्यू हृदयविकाराने होतात, तर गेल्या दशकभरात दरवर्षी 15 पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. एकूण संख्येच्या 25 टक्के म्हणजेच 347 पोलिसांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला आहे. सशस्त्र पोलिस दलातील 687 पोलिसांचा दशकभरात ड्यूटीवर असताना मृत्यू झाला आहे. प्रादेशिक वाहन विभागातील 86 कर्मचा-यांचाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे मृत्यू झाला आहे. एकूणच दहा वर्षाच्या कालावधीत सरासरी 120 पोलिसांना दरवर्षी कर्तव्यावर असताना गतप्राण व्हावे लागले. मुंबईत आणि उपनगरात जवळपास 2 कोटी नागरिक राहतात. त्यांच्या सुरक्षेसाठी 41 हजार 401 पोलिस कर्मचारी संख्येला जुलै 2012 रोजी मंजुरी देण्यात आली असली तरी 18 टक्के कर्मचारी अद्यापही भरण्यात आले नाहीत.


पोलिसांना वेळेचे बंधन न पाळता जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार होतात. तसेच त्यांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. वेळेवर जेवण मिळत नाही आणि मिळालेच तर ते पौष्टिक नसते. त्यामुळे आजार होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
निकेत कौशिक, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे)