आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Every Year Thirteen Thousand Crores Vegtable Not Conserve

दरवर्षी तेरा हजार कोटींच्या भाजीपाल्याची होते नासाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फळे व भाजीपाला उत्पादनामध्ये आपल्या देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. मात्र, या फळांची व भाजीपाल्याची साठवणूक करण्यासाठी पुरेशी शीतगृहे किंवा वाहतुकीसाठी वातानुकूलित व्यवस्था नसल्याने दरवर्षी 13 हजार कोटींहून अधिक किमतीची फळे व भाजीपाला फेकण्याची वेळ उत्पादकांवर येते.
दरवर्षी अशा प्रकारे नासाडी होणा-या या फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यांचे मूल्य साधारणपणे 44 हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यापैकी बहुतांश भाग हा फळे व भाजीपाल्याच्याच नासाडीचा आहे. अन्नधान्याच्या नासाडीची सरासरी फार जास्त नाही. मात्र, नासाडी होणा-या फळांच्या आणि भाजीपाल्याच्या टक्केवारीचा विचार करता एकूण उत्पादनाच्या सरासरी 18 टक्के फळे व भाजीपाल्याची नासाडी होत असते. इमर्सन क्लायमेट टेक्नॉलॉजीज इंडिया या कंपनीने मिळवलेल्या माहितीवरून ही आकडेवारी समोर आली आहे.
उच्च प्रतीच्या शीतगृहांची कमतरता आणि निर्यात करण्यासाठी वातानुकूलित मालवाहतुकीच्या अपु-या सुविधा यामुळे हा तोटा सहन करावा लागत असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या मालाचे उत्पादन होणा-या शेतीपासून ते थेट ग्राहकांपर्यंत हा माल पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर साठवणुकीसाठी शीत गृहे आणि इतर सोयीसुविधांमध्ये वाढ केल्याशिवाय या परिस्थितीमध्ये बदल होणे शक्य नसल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.