आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या घराबाहेर सन्नाटा, सलीम वगळता कोणीही घर सोडले नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी सलीम खान त्यांच्या मित्रांसह. - Divya Marathi
सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी सलीम खान त्यांच्या मित्रांसह.
मुंबई - सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमदील घरी सध्या सन्नाटा पसरला आहे. गुरुवारी सकाळी सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले पण घरातील दुसरा एकही सदस्य घराबाहेर दिसला नाही. बुधवारी रात्री सलमान जेव्हा दिवसभर कोर्टात राहून जामीनावर घरी परतला होता, त्यावेळी त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनीही त्याच्या घरी गर्दी केली होती. सलमानला 13 वर्ष जुन्या हिट अँड रन प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्याच्या जामीनावर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

शिक्षा होणार हे वाटतच होते, पण एवढी मोठी होईल अशी अपेक्षा नव्हती
सलीम खान यांचे जवळचे मित्र आणि सलमान खानचे नीकटवर्तीय जयप्रकाश चौकसे सांगतात की, निकालाच्या एक दिवस आधीपासूनच सलमानच्या घरचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते. सगळेच टेन्शनमध्ये होते. शिक्षा होणार हे सर्वांना माहितीही होते, पण एवढी होईल असे वाटत नव्हते. रात्रीपासूनच त्याच्या घरी अनेकांचे येणे जाणे वाढले होते. पण बुधवारी सकाळी सलमान कोर्टाकडे गेल्यानंतर कुटुंबातील इतर लोक त्याचठिकाणी थांबले होते. शेजारीच वहिदा रेहमान यांचे घर आहे. त्याही आल्या होत्या. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत त्या सलीमा खान यांच्याबरोबर होत्या. सलमा यांच्या बहिणी आणि सलमान खान यांचे वडील सलीम यांचे नातेवाईकही तोवर घरी आले होते. सलीम स्वतःला सावरत होते, पण सलमा या अत्यंत दुःखी होत्या. दुपारी कोर्टाचा निर्णय येताच सलमा यांची प्रकृती बिघडली. त्यांना भोवळ आली होती. कोर्टात सोहेल खानला ते समजले तेव्हा तो तातडीने घरी गेला.

2002 मध्ये जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हापासूनच घरच्या सर्वांना असे वाटत होते की, निकाल विरोधात येईल पण दीड ते अडीच वर्षांची शिक्षा होईल आणि तीही रद्द होऊ शकेल असे सगळ्यांना वाटत होते. पाच वर्षांच्या शिक्षेसाठी कोणाचीच मनाची तयारी नव्हती. विशेष म्हणजे सदोष मनुष्यवधाचे कलमही नंतर लावण्यात आले.

सलमानला त्याच्या सेलिब्रिटी स्टेटसमुळे जास्त शिक्षा मिळत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांना वाटत होते. सलमाची प्रतिमाच आजवर तशी राहिली आहे. त्याने अनेक चांगली कामेही केली आहेत. पण कायदा ते काही पाहत नाही. सलमान त्याच्या कमाईतील 70 ते 80 टक्के रक्कम दान देतो. त्याचे वडील सलीम त्याला नेहमी म्हातारपणासाठी पैसे जमा करण्याचा सल्ला देतात. पण तो ऐकत नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO