आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकार तरावे हीच राष्ट्रवादीची इच्छा, विश्वासदर्शक ठरावाकडे राज्याचे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याबाबत अजूनही शिवसेना ठोस भूमिका घेऊ शकलेली नाही. या सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतल्यास विरोधी बाकांवर बसण्याची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केली असली तरी आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा मागितलेलाच नसल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी होणा-या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपची साथ सोडण्यापर्यंत शिवसेनेला आणून ठेवल्याबद्दल शरद पवार राजकारणात चमत्कार कसे घडवू शकतात? एका दगडात अनेक पक्षी मारण्यात पवार कसे पटाईत आहेत हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात ४१ जागा मिळाल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला हा पक्ष सध्या मात्र किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादी तटस्थ राहू शकते. वेळ पडल्यास सरकारच्या बाजूने मतदानही करू शकते. मात्र तटस्थ राहणेच राष्ट्रवादी- भाजपसाठी फायद्याचे आहे. कारण त्यामुळे आम्ही सरकारला पाठिंबा दिला नसल्याचे राष्ट्रवादी सांगू शकते व ‘ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्या पाठिंब्यावरच सरकार तारले’ हा ठपकाही भाजपच्या माथी लागणार नाही.
शिवसेनेला सत्तेपासून तर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवण्याची पवारांची रणनिती आहे. मात्र, तसे झाले नाहीतर राष्ट्रवादी नेत्यांच्या मागचा चौकशीचा ससेमिरा टाळता येणार नाही.