आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everywhere See Corruption, Uddhav Thackeray Attacked On BJP

सध्या जिकडे पाहावे तिकडे भ्रष्टाचार दिसतोय, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात सत्तेत सहभागी झाल्यानंतरही गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने भाजपवर कधी आडून तर कधी थेट टीका करायला सुरुवात केली आहे. सध्या जिकडे पाहावे तिकडे भ्रष्टाचार दिसतो आहे,'असे सांगत रविवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधील तणाव वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिवसैनिकांना उद्योजक बनवण्याचा संकल्प सोडत रविवारी उद्धव ठाकरेंच्या हस्ते काळाचौकी येथील भगतसिंग मैदानावर दहा टेम्पोंचे वाटप करण्यात आले. या वेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुखांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. निवडणुकीपूर्वी प्रत्येकाला सुबत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण त्याची पूर्तता झाली नाही. तसेच आम्ही तुम्हाला फ्रिज देऊ, टीव्ही देऊ, अशी अाश्वासने दिली गेली. पण तुमचा टीव्ही घेऊन त्यावर पाहायचे काय तुमचा भ्रष्टाचारच ना? असा सणसणीत टोला लगावत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या ताब्यात असलेल्या वीज विभागावरही टीका केली. अनेक गावात आता मोठ मोठे टॉवर उभे राहिले, पण अजून राज्यातील कित्येक गावात विजेचे टाॅवर गेले नाहीत त्याचे काय याचे उत्तर द्या, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

मी जनतेकडे शिवसेनेची संपूर्ण सत्ता मागितली होती. मात्र, पूर्ण सत्ता मिळाली नाही म्हणून आम्ही निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनापासून पाठ फिरवली नाही, असे सांगत हा मराठी माणूस एक दिवस शिवसेनेला नक्कीच एकहाती सत्ता देईल, याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, अनेकजण शिवसेनेवर वडापावच्या गाडीवरून टीका करतात. पण टीकाकारांना मी इतकेच सांगेन की, मराठी माणसाला शिवसेनेने स्वाभिमान दिला. मराठी माणूस उद्योग क्षेत्रात मागे नाही, हे दाखवून दिले पाहिजे. शिवसेनेने जर गेल्या पन्नास वर्षांत मराठी माणसासाठी काहीच केले नसते तर एवढा जनसागर शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला असता का ? असा सवालही त्यांनी या वेळी केला.

पुढे वाचा... भाजपच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचाही वापर