आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांना अखेरचा निराेप, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता (वय ७७) यांचे रविवारी मध्यरात्री मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. रविवारी रात्री मात्र त्यांची प्रकृती खूपच खालावली व मध्यरात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी संध्याकाळी शिवाजी पार्क येथे त्यांना अखेरचा निराेप देण्यात अाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य व देशपातळीवरील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त केला अाहे.
१९६२ मध्ये जनसंघाचे प्रतिनिधित्व करत राजकारणात उतरलेल्या जयवंतीबेन १९६८ मध्ये नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आल्या. त्यानंतर १० वर्षे त्यांनी महापािलकेचे प्रतिनिधित्व केले. आणीबाणीत १९ महिने तुरुंगवास भोगलेल्या जयवंतीबेन १९७८ मध्ये विधानसभेवर निवडून गेल्या. वाजपेयी सरकारमध्ये १९९६ ते ९९ या काळात त्या केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री होत्या.

मध्यमवर्गीय कुटुंबातील जयवंतीबेन यांचा गृहिणी ते केंद्रीय मंत्री असा प्रवास हाेता. भाजपमधील युवा नेत्यांसमोर त्या आदर्श होत्या. मुंबईसह महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी भाजप धडपड करत असताना जयवंतीबेन यांनी पक्षासाठी दिलेले योगदान खूप महत्त्वाचे ठरले होते. राम नाईक, वामनराव परब, हशू अडवाणी, चंंद्रकांता गोयल या सहकारी नेत्यांच्या साथीने त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत भाजपचा किल्ला लढवला हाेता.

१९६२ साली जनसंघाचे प्रतिनिधित्व करत राजकारणात उतरलेल्या जयवंतीबेन १९६८ साली नगरसेविका म्हणून पहिल्यांदा निवडून आल्या. त्यानंतर दहा वर्षे त्यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले. आणीबाणीत १९ महिने तुरुंगवासाची शिक्षा सहन कराव्या लागलेल्या जयवंतीबेन १९७८ मध्ये विधानसभेवर निवडून आल्या होत्या. जनसंघाचे भाजपमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यांचा पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये समावेश होता.

१९८९ मध्ये दक्षिण मुंबईतून जयवंतीबेन यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या एनडीए सरकारमध्ये १९९६ ते ९९ या काळात त्या केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री होत्या. नंतर मात्र मिलिंद देवरा यांच्याकडून दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर त्या सक्रिय राजकारणामधून बाजूला झाल्या होत्या. गेली काही वर्षे प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना पूर्वीप्रमाणे जोमाने पक्षकार्य करता येत नव्हते. मात्र तब्येत चांगली असेपर्यंत त्या न चुकता नरिमन पाॅइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत येऊन युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधत. ‘मार्चिंग विथ टाइम’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे.
जयवंतीबेन यांचे कार्य पथदर्शी : मुख्यमंत्री
जयवंतीबेन यांनी नगरसेवक, आमदार, खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून पथदर्शी कार्य केले होते. त्यांच्या निधनाने भाजपने एक ज्येष्ठ नेतृत्व गमावले असून पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे अनुभवाचे बोल खूप महत्त्वाचे असायचे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

अाैरंगाबादेत जन्म : जयवंतीबेन यांचा जन्म अाैरंगाबादचा. येथील गुजराती विद्या मंदिर, शारदा शिक्षण मंदिरात त्यांचे शालेय शिक्षण झाले. मात्र विवाहानंतर मुंबईत स्थायिक झाल्या. मात्र औरंगाबादवर विशेष प्रेम होते. अापल्या शाळेसाठी, गुजरात भवन तसेच द्वारकानाथ मंदिराच्या विकासासाठीही त्यांनी मदत केली.
बातम्या आणखी आहेत...