नागपूर/मुंबई- पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि संघ यांच्या दिशा वेगवेगळ्या असल्याने देशाचे वाटोळे होत आहे. मोदी कोणाचेच ऐकत नसल्याने संघसुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात बोलताना केला.
मोदींचा प्रभाव, त्यांची आश्वासने आणि निवडणूक विजय पाहता किमान दहा वर्षे विरोधातच बसावे लागेल आम्हाला वाटत होते. तथापि, तीन वर्षात त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मागचा पुढचा विचार न करता आश्वासने दिली, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जनताच विरोधात प्रचार करायला लागली आहे. सोशल मीडियावर ते आता व्हीलन ठरू लागले आहेत, असे चव्हाण म्हणाले.
भाजप विरोधात काँग्रेसला आता रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधात घोटाळ्याचे भक्कम पुरावे असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. स्वच्छ प्रतिमेचे दवे करणारे मुख्यमंत्री त्यांना वाचवित आहेत. याविरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो.....