आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ex Cricketer Sunil Comment To Member Of Parliment Sachin Tendulkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'खासदार सचिनने केवळ क्रिकेटपुरते मर्यादित राहू नये'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: ब्लास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आता केवळ क्रिकेटपटू राहिलेला नाही. सचिन आता राज्यसभेचा खासदार झाला आहे. त्यामुळे सचिनने केवळ क्रिकेटपुरते मर्यादीत राहून चालणार नाही. त्याला क्रिकेट क्षेत्राशिवाय सर्वसामान्यांशी निगडित मुद्यांवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असा सल्ला लिटील मास्टर सुनील गावस्करने दिला.
सचिनवर आता एक मोठी जबाबदारी आहे. ती पूर्णत्वास नेण्याची त्याच्यात क्षमताही आहे. खासदार सचिनने क्रिकेटसाठीच नव्हे तर अन्य खेळांच्या विकासासाठीही प्रयत्न केले पाहिजे. या व्यतिरिक्त सचिनने सर्वसामान्य जनतेसाठी संसदेत आवाज उठवावा, असे गावस्करने सांगितले.
गावस्कर यांचा सल्ला खासदास सचिन किती अमंलात आणतो, याकडे आता सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
VIDEO : सचिन तेंडुलकर खासदार झाल्यावर काय म्हणाला, पाहा...
सचिन आणि अंजलीची प्रेम कहाणी, पाहा व्हिडिओ...
सचिन, सौरवला 'भारतरत्न' देऊ नयेः न्‍या. काटजू