आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या छातीवर बसून चाकूने केले 9 वार; मुंबईत दुसर्‍या पत्नीने केली माजी हॉकीपटूची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपय्या हे उत्कृष्ट हॉकीपटू होते. - Divya Marathi
अपय्या हे उत्कृष्ट हॉकीपटू होते.
मुंबई- माजी हॉकीपटूच्या हत्या केल्याचा आरोप त्याच्या पत्नीवर केला जात आहे. पतीच्या छातीवर बसून आरोपी महिलेने 9 वार केल्याचे समोर आले आहे. सध्या आरोपी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलमधून तिला आज (सोमवारी) डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस तिला अटक करू शकतात.

प्रॉपर्टीच्या वादातून झाली हत्या...
-मुंबई पोलिसांच्या गोरेगांव विभागाचे एसीपी सुरेश शिंदे यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी दुपारी दीड-दोन वाजेच्या सुमारास झाली होती.
- मालाड वेस्टचे अग्रवाल ट्रिनिटी, ध्रुव पार्क (A.T.T ) बिल्डिंगच्या 27व्या मजल्यावर माजी हॉकीपटू अपय्या देवय्या चेनन्दा (52) आणि पत्नी अमिता अपय्यासोबत राहात होते.
- दोघांमध्ये प्रॉपर्टीवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. शनिवारी दुपारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद विकोपाला जाऊन अमिता हिने पतीच्या छातीवर बसून त्याच्यावर तब्बल नऊ वार केले.
- अपय्या देवय्या चेनन्दा हे एका डेटा कंपनीत नोकरी करत होते. यादरम्यान अमिता अपय्या हिच्याशी प्रेम जुळले होते. नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे अपय्या विवाहीत होते. तरीही त्यांनी दुसरे लग्न केले होते.
- अपय्या यांची पहिली पत्नी बंगळुरुत राहाते. मात्र मुलगा गणपती वडिलांसोबत मुंबईत राहात होता.
- अपय्या याला अमितापासून एक मुलगी आहे. ती शिक्षणासोबत मॉडलिंगही करते.
- अपय्या हे उत्कृष्ट हॉकीपटू होते. ते एअरइंडिया, टाटा आणि मुंबई टीममध्ये खेळत होते.

छातीवर बसून चाकूने केले होते 9 वार
- पोलिस चौकशीमध्ये समोर आले की, अमिता आणि अपय्यामध्ये झटापट झाली. अपय्या जमिनीवर कोसळल्यानंतर अमिताने त्याच्या छातीवर बसून चाकूने तब्बल नऊ वार केले.  
- अपय्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. अपय्या आणि अमितामध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरु होता.
- दोघांच्या झटापटीमध्ये अमिताही किरकोळ जखमी झाली होती. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
- मालाड पोलिसांत अपय्याचा मोठ्या मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर अमिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... माजी हॉकीपटू अपय्या देवय्या चेनन्दाचे फोटो
बातम्या आणखी आहेत...