आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेत बाधा आणल्यास प्राध्यापकांवर गुन्हे; परीक्षा वेळेत घेण्याची कुलगुरूंना तंबी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये बाधा उत्पन्न करणा-या शिक्षक संघटनांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आणि कुलगुरूंना दिले आहेत. विद्यापीठांच्या परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाच्या कुलसचिवांवर राहणार असून केंद्रप्रमुख म्हणून महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी परीक्षांचे नियोजन करण्याचे कठोर निर्देश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.


परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकता भासल्यास कुलगुरूंनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 1994 मधील अधिकारांचा वापर करावा, प्रश्नपत्रिका संच बनवण्यासाठी कायम विनाअनुदानित, हंगामी, कंत्राटी शिक्षक, नेट, सेट उत्तीर्ण विद्यार्थी तसेच तासिका तत्त्वांवरील शिक्षकांकरवी परीक्षा घ्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठीही हंगामी, कंत्राटी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना उच्च शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. 4 फेब्रुवारीपासून 10 विद्यापीठांतील आणि हजारो वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक संपावर असून परीक्षांच्या सर्व कामांवर त्यांनी बहिष्कार घातला आहे.