आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षबदलाचे वारे : शिवसेना-मनसे व राष्ट्रवादीत सध्या \'एक्सचेंज ऑफर\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ पुणे- लोकसभा निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत तर, पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरु केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महत्त्वाचे असणारे प्रादेशिक पक्षात चांगलीच एक्सचेंज ऑफर सुरु झाल्यासारखे या पक्षातील नेते इकडून तिकडे, तिकडून इकडे अशा बेडूक उड्या मारताना दिसत आहे. यात शिवसेना, मनसेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश आहे.
पुण्यातील हडपसर भागातील शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी आज मनसेत प्रवेश केला. या दोघांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राज यांनी त्यांचे स्वागत पक्षात प्रवेश दिला. पुण्याच्या नेत्या नीलम गो-हे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून भानगिरेंनी सेनेला जय महाराष्ट्र केल्याचे समजते. पुण्यातील विश्रांतवाडी टिंगरेनगर भागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीतील गटबाजीला कंटाळून व पक्षात दुय्यम स्थान देण्यात येत असल्यामुळे मनसेत प्रवेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे.