मुंबई- अंडरवर्ल्डमधील गुंड व विदेशात पळून गेलेल्या रवी पुजारीने प्रिती झिंटा हिच्या विनयभंगाच्या तक्रारीला वेगळेच वळण दिले आहे. दक्षिण अफ्रिकेत दडून राहत असलेल्या रवी पुजारीने वाडिया समुहाला फोन करून धमकी दिल्याचे पुढे आले आहे. रवी पुजारीने स्वत:ला आपण प्रितीचा जबरदस्त फॅन असल्याचे तिला त्रास देऊ नये असे म्हटले आहे. याबाबतची तक्रार नेस वाडियाचे पिता नुस्ली वाडिया यांनी पोलिसांत दिली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी पुजारी प्रिती झिंटाचा जबरदस्त फॅन आहे तसेच वाडियाना फोन वरून धमकी देऊन तो फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवर आपण विश्वास ठेवला तर रवी पुजारी व वाडिया समुहाशी जे बोलणे झाले त्याचा काही मजकूर आपल्याकडे उपलब्ध झाला आहे. ज्यात कोणीतरी व्यक्ती आपण रवी पुजारी असल्याचे सांगत आहे. पोलिस आता रवी पुजारीचे व्हाईस सॅंपल तपासात आहेत. (रवी पुजारी अंडरवर्ल्डमध्ये येण्यापूर्वी प्रथम एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. त्यामुळे पुजारी चांगले इंग्रजी बोलतो)
रवी पुजारीने वाडिया यांच्या सचिवाला 16 जून रोजी चार वेळा फोन व एकदा एसएमएस केला. पहिला कॉल 12.22 pm, 1.11 pm, 1.13 pm आणि चौथा कॉल सायंकाळी 4. 30 मिनिटांनी आला बोता. या मोबाईलचा आयपी अॅड्रेस इराणचा दाखवत आहे तर, मोबाईलवर हा ऑस्ट्रेलिया देशाचा कोड दाखवत आहे.
दुसरीकडे, प्रिती झिंटा आज मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. नेस वाडिया प्रकरणाबरोबर पोलिस तिला रवी पुजारीशी संबंधित प्रश्न विचारतील. पोलिसांनी प्रितीसह तिचे नातेवाईक व जवळच्या मित्रपरिवारांच्या फोनवर नजर ठेवली आहे. कारण रवी पुजारी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील व त्यातून काही ठोस माहिती हाती लागू शकेल.
खाली वाचा वाडिया समुहाला आलेल्या पाच धमकीच्या फोन कॉल्सचा काही मजकूर...
सेक्रेटरी: हॅलो हू इज दिस...? (नॉइज डिस्टॉर्शन)
रवि पुजारी: दिस इज रवि पुजारी हॅलो..आय एम कॉलिंग ऑन बि-हाफ ऑफ प्रिती
झिंटा...मैं प्रिती की तरफ से कॉल कर रहा हूं...(असे दोनदा तो बोलतो)
सेक्रेटरी: यस टेल मी...हाऊ कॅन आय हेल्प यू...
रवि पुजारी: तेरे बॉस को बोल...प्रिती को ट्रबल नहीं करने...को..इस मॅटर में से हाथ निकाल दे वरना लग जाएगी...मेरा नंबर लिख...एंड आस्क योर बॉस...मिस्टर वाडिया टु टॉक टु मी वरना...सारे बिजनेस पर इफेक्ट पड़ेगा..
रवि पुजारी: आय विल कॉल अगेन...उसको बोल मेरा कॉल उठाने को..पिक अप
रवी पुजारीने प्रिती म्हटले होते रियल हीरो...? याचबरोबर वाचा रवि पुजारीचा इतिहास आणि बॉलिवूडच्या कोणत्या-कोणत्या स्टॉर्सना दिली आहे त्याने धमकी...