आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exhomeminister R R Patil With Bollywood Celebrity

बॉलिवूडकरांसोबतचे आबा, सिंघमने दिल्या होत्या \'मुंबई पोलिस\'ला दोन टाटा सुमो भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राची माजी गृहमंत्री आणि सर्वांचे लाडके आर.आर. पाटील उर्फ आबा यांचे काल मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. आबा जेवढे राजकारण्यांना, कार्यकर्त्यांना प्रिय होते तेवढेच ते बॉलिवूडकरांनाही प्रिय होते. त्याकरिताच त्यांच्या अनेक कार्यक्रमात आबा आवर्जून उपस्थित राहायचे. तसेच शासकीय कार्यक्रमातही ते बॉलिवूडकरांना आमंत्रित करायचे. आबा गृहमंत्री असताना बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांनी आबांना भेटून मुंबई पोलिसांना पेट्रोलिंगसाठी दोन टाटा सुमो भेट दिल्या होत्या. तसेच 'मुंबई पोलिस'च्या कार्यक्रमातही बॉलिवूड सेलिब्रिटींना बोलावण्यात आले होते. अशाच कार्यक्रमातील बॉलिवूडकरांसोबतचे आबांचे फोटो Divyamarathi.com घेऊन आला आहे खास तुमच्यासाठी...

पुढील स्लाईडवर पाहा, आबांचे बॉलिवूडच्या दिग्गद सेलिब्रेटींसोबतचे काही निवडक फोटो...