आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्झिट पोल : मुंबईत शिवसेना-भाजपची टक्कर, ठाणे शिवसेना तर पुणे भाजपकडे जाण्याचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  मुंबईत शिवसेना माेठा पक्ष, नागपूर- पुणे भाजपकडे मतदान संपताच ‘अॅक्सिस–इंडिया टुडे’ने  एक्झिट पोल जाहीर केला. त्यानुसार मुंबईत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि नागपूर-पुणे भाजपकडे जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
इंडिया टुडे अॅक्सिस एक्झिट पोलनुसार मुंबईत अशी असेल स्थिती 
शिवसेना - 86-92 जागा 
भाजप - 80-88 जागा 
काँग्रेस - 30-34 जागा 
मनसे - 5-7 जागा 
राष्ट्रवादी - 3-6 जागा     

इंडिया टुडे आणि अॅक्सिस यांनी जाहीर केलेल्या या एक्झिट पोलमध्ये मुंबईत शिवसेना आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या एक्झिट पोल नुसार शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरणार असे समोर आलेले आहे. तरीही भाजपला शिवसेनेपेक्षा दोन ते चारच जागा कमी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे या एक्झिट पोलवरून स्पष्ट झाले आहे. 
 
मुंबई   227
शिवसेना    86 ते 92
भाजप   80  ते 88
काँग्रेस    30 ते 34
मनसे    5 ते 7
राष्ट्रवादी    3 ते 6
 
 
Zee24 तास एक्झिट पोलनुसार मुंबईत अशी असेल स्थिती
शिवसेना - 90-96 जागा 
भाजप - 78-82 जागा 
काँग्रेस - 27-30 जागा 
मनसे - 7-9 जागा 
राष्ट्रवादी - 3-5 जागा
 
 
मनेसेची घसरण
या एक्झिट पोलनुसार मुंबईत मनसेची घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या सर्व्हेनुसार मनसेला मुंबईत केवळ 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, या एक्झिट पोलनुसार कशी असेल विविध महानगरपालिकेतील आकडेवारी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...