आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Explosion, Fire On Navy Submarine INS Sindhurakshak In Mumbai; 18 Personnel Missing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नौदलाच्या \'आयएनएस सिंधुरक्षक\' पाणबुडीत भीषण स्‍फोट; 18 जवान बेपत्ता, बचावकार्य सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील कुलाबा परिसरात भारतीय नौदलाच्या 'आयएनएस सिंधुरक्षक' या पाणबुडीमध्ये स्फोट झाल्‍यानतर भीषण आग लागली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत 18 जवान बेपत्ता असल्‍याचे कळते. हे सर्व जवान पाणबुडीतच अडकल्‍याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. मुंबईतील नौदलाच्‍या तळावर पाणबुडी उभी होती. सिंधुरक्षकला आग लागल्‍यानंतर बाजुलाच उभ्‍या असलेल्‍या आणखी एका पाणबुडीलाही आग लागली.

प्राप्‍त माहितीनुसार, पाणबुडीमध्‍ये भीषण स्‍फोट झाला. त्‍यानंतर आग लागली. आग लागल्‍यानंतर पाणबुडीतील कर्मचा-यांनी पाण्‍यात उड्या मारल्‍या. काही जण आत अडकले. त्‍यात तीन नौदल अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आगीमुळे पाणबुडीचे मोठे नुकसान झाल्‍याचीही माहिती आहे. यासंदर्भात नौदलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. पहाटे 3 वाजताच्‍या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्‍यात यश आले. पाणबुडीत अडकलेल्‍यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्‍याचे सर्वतोपरी प्रयत्‍न करण्‍यात येतील, असे नौदलाचे प्रवक्ते पीव्‍हीएस सतीश यांनी दिली.