आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Export Sugar Or Lose Concessions: CM Devendra Fadnavis

निर्यात करा, अन्यथा सवलतीच काढून घेऊ; साखर कारखानदारांना तंबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘राज्यातील साखर कारखान्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या १२ टक्के कोट्यातील संपूर्ण साखर निर्यात करावी. साठा शिल्लक राहिल्यास साखरेचे दर कोसळतील, अशी भीती व्यक्त करत निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या साखर कारखान्यांच्या कर सवलत काढून घेतल्या जातील’, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यातील कारखानदारांना िदली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साखर निर्यात धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्यासह साखर कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘केंद्र शासनाने प्रत्येक कारखान्यांना ठरवून दिलेल्या १२ टक्के कोट्यातील शंभर टक्के साखर निर्यात करावी. तसेच सहवीज निर्मिती करणाऱ्या ज्या साखर कारखान्यांना दहा वर्षांची ऊस खरेदी कर सवलत मिळाली आहे, अशा कारखान्यांनीही कोट्यातील साखर १०० % निर्यात करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची ऊस खरेदी कर सवलत काढून घेतली जाईल.’

मराठवाड्यास वेगळे निकष ठेवा : मुंडे
दुष्काळामुळे ऊस उत्पादन पुरेशा प्रमाणात नसaल्यामुळे मराठवाड्यातील इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्प अडचणीत आहेत. निर्यातीचा कोटा पूर्ण केला तर देशांतर्गत बाजारात विकण्यासाठी साखर शिल्लक राहत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील कारखान्यांचा सहानुभूतीपूर्व विचार करण्याची विनंती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

कारखानदारांची विनंती मुख्यमंत्र्यांकडून मान्य
तीन वर्षांतील गाळपाच्या १२ टक्के कोटा निर्यातीसाठी ठरवण्यात येतो. यंदा दुष्काळामुळे कमी गाळप झाले अाहे, त्यामुळे निर्यातीचा कोटा यंदाच्या गाळपाच्या १२ टक्के ठरवण्याची कारखानदारांची िवनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली अाहे. राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे-पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली.
पुढे वाचा, काटकसर करा : पवार