आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीजबिल भरण्यास 15 तारखेपर्यंत मुदतवाढ; मुद्दल पंधरा दिवसांत भरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांकडून कृषिपंपाच्या वीज बिलाची वसुली होत नसल्याने ऊर्जा विभाग हैराण झाला असून शेतकऱ्यांना व्याज माफ करून वीज बिल भरण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदतवाढ  देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिलावरील ८,१६० कोटीची व्याजाची रक्कम मुख्यमंत्री कृषी संजीवन योजनेच्या अंतर्गत माफ करण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात दिली. मुद्दलाची ११ हजार कोटी रक्कम शेतकऱ्यांनी  भरावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.   

३० अाॅक्टाेबर राेजीच उर्जा मंत्र्यांनी  मुख्यमंत्री कृषी संजीवनी याेजना जाहीर केली हाेती. त्यानुसार शेतकऱ्यांना चालू बिल व थकबाकीचा पहिला हप्ता ७ नाेव्हेंबरपर्यंत भरायचा हाेता. मात्र अाता त्यासाठी १५ नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात अाली अाहे. या रकमेचा भरणा करण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना सूट दिली असून ३० हजारांच्या आत बिल असलेल्या शेतकऱ्यांना ५ टप्प्यांत, तर ३० हजारांच्या वर बिल असलेल्या शेतकऱ्यांना १० टप्प्यांत रक्कम भरावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या याेजनेत शेतकऱ्यांना व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार अाहे. मात्र  या मुदतीत रक्कम भरली नाही तर नाइलाजास्तव  वीज जोडणी तोडण्यात येणार आहे.   

राज्यात ३ वर्षांत कुठल्याही शेतकऱ्याची वीज तोडण्यात आलेली नाही. १ रु.२० पैसे ते १ रु.८० पैसे युनिट दराची वीज शेतकऱ्यांना दिली जात आहे. यासाठी ६.३० रुपये सरकारला खर्च येत आहे.  राज्यात ४१  लाख शेतकऱ्यांवर १९ हजार कोटी बिलाच्या रकमा थकीत आहेत. यामधील ८,१६० कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  केवळ ११ हजार कोटी मुद्दल रक्कम भरण्याची गरज असून १५ दिवसांत सध्याचे चालू बिल भरून कनेक्शन तोडण्यापासून वाचवले जाऊ शकते, असे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत वीजबिलेच मिळाली नाहीत, त्यांना ती तातडीने पाेहाेच करावीत, असे अादेशही बावनकुळे यांनी महावितरण कंपनीला दिले अाहेत.
 
वसुली अन्यायकारक नाही; बावनकुळे यांचे स्पष्टीकरण
शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने ऊर्जा विभागावर अन्यायकारक वीज बिल वसुलीचा आरोप लावण्यात आला आहे. याबाबत बावनकुळे म्हणाले, कुठलीही वीज बिल वसुली अन्यायकारक नाही. आम्ही केवळ विनंती करत आहोत. १५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित केले जाणार नाही. तसेच थकिब बिलाच्या मुद्दल रकमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल रकमेचे पाच हप्ते डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...