आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'फुल पडले' ऐवजी 'पूल पडला' ऐकल्याने झाली एलफिन्स्टन फुटओव्हर ब्रिजवर चेंगराचेंगरी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'फुल पडले' या ऐवजी 'पूल पडला' असे ऐकण्यात आल्याने धांदल उडाली आणि एलफिन्स्टन स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजवर चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली, असा दावा या दुर्घटनेत वाचलेल्या शिल्पा विश्वकर्मा या विद्यार्थिनीने केला आहे.

दरम्यान, एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर गेल्या आठवड्यात (शुक्रवारी) सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला तर 39 प्रवासी जखमी झाले.

शिल्पाने सांगितले की, ती नेहमीप्रमाणे विले पार्ले येथे अभियांत्रिकीच्या क्लाससाठी जात होती. पाऊस असल्यामुळे पुलाचा आधार घेत सर्व जण जात होते. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फुले वाहून नेण्यात येत होती. पुलावरून डोक्यावर फुले वाहून नेणारा एक व्यक्ती येत होता. त्याच्या डोक्यावरील गोणीतून काही फुले खाली पडताच ‘फुले पडली’ असा आवाज आला. मात्र, पुलावरून जाणार्‍या काहींना फुलांऐवजी 'पूल पडला' असा गैरसमज निर्माण होऊन गोंधळ उडाला. या सर्व गोंधळात एका व्यक्तीचा पाय सरकला आणि अनेक जण हळूहळू एकमेकांवर पडू लागल्याचे शिल्पाने सांगितले.

दरम्यान, पाऊस, त्यामुळे पादचारी पुलावर झालेली गर्दी आणि त्यातच पूल पडल्याची अफवा, हे चेंगराचेंगरीचे कारण पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्‍यात आले होते.

किती जुना आहे एलफिन्स्टन ब्रिज?
- एलफिन्स्टन ब्रिज 104 वर्षे जुना आहे. 1911 मध्ये लॉर्ड एलफिन्स्टन या नावाने स्टेशन बनवण्यात आले. नंतर दोन वर्षांत एफओबी स्थापन करण्यात आले. एलफिन्स्टन 1853 ते 1860 या काळात ते मुंबईचे गव्हर्नर होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... या चेंगराचेंगरीशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...