आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरी चळवळ सातासमुद्रापार, आंबेडकराइट्स मूव्हमेंटच्या पेजला मिळाले लाखो फॉलोअर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोशल मीडियावर युवा पिढी करत असलेली चर्चा कोणी गांभीर्याने घेत नाही. परंतु आंबेडकराइट्स मूव्हमेंटच्या फेसबुक पेजने एक मोठा विक्रम नोंदवला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या युवकांनी सुरू केलेल्या वर्ल्डवाइड पेजला जगभरातून लाखापेक्षा अधिक भीम अनुयायी लाभले आहेत. विशेष म्हणजे त्यातील वीस हजार मेंबर्स सक्रिय असून ते समाजाच्या प्रश्नांवषयी येथे माहितीचे आदानप्रदान करतात.

सोशल मीडियावर विचार मांडायचे याच विचारातून काही समविचारी मित्र एकत्र आले आणि त्यांनी चार वर्षांपूर्वी ही चळवळ सुरू केली. काळ बदलला असून त्यानुसार चळवळीची साधने बदलणे गरजेचे झाल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यासारख्या व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या झाल्या. सोशल मीडियानेच त्यांना तरुणाईची साथ मिळवून दिली. त्यामुळे या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला पुनरुज्जीवन देण्याचे काम हाती घेतले असल्याचे ‘फॅम’चे कार्यकर्ते गणेश चव्हाण यांनी सांगितले.
फेसबुक चळवळीमध्ये डॉक्टर, अभियंते, प्रोफेसर अशा विविध क्षेत्रांतील व्यावसायिक तरुणांचा चमू आहे. समविचारी म्हणजे केवळ दलितच नाही तर इतर जातींच्या युवकांचादेखील यात मोठा समावेश आहे. संविधानाला अधिष्ठान मानणारा कोणताही युवक या चळवळीत सहभागी होऊ शकतो, असेही चव्हाण यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळ म्हणजे जलसे आणि रात्ररात्र चालणाऱ्या गायन पार्ट्या, अशीच आपली समजूत आहे. मात्र, आता या चळवळीने फेसबुकला जवळ केले असून तळातील, शोषित समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आंबेडकराइट्स मूव्हमेंट पेजला लाभलेल्या फालोअर्सची संख्या अचंबित करायला लावणारी आहे.
औरंगाबादसह मुंबई, सोलापुरात चळवळ
मुंबईसह सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, सातारा यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रबोधनाची ही चळवळ कार्यरत असून पथनाट्यातून समाजजागृती करण्याचे काम ही मंडळी करतात. त्याचबराेबर संविधान राबवणाऱ्यांचे हात सक्षम करणे अाणि समाजकारणाने प्रेरित राजकारण हे या युवकांचे ध्येय अाहे. शैक्षणिक प्रश्नांचीदेखील या प्लॅटफार्मवर चर्चा होत आहे.
पेजवर २० हजार
कार्यकर्ते सक्रिय
साेशल मीडियाच्या माध्यमातून आंबेडकराइट्स मूव्हमेंटची ही चळवळ ऑस्ट्रेलिया, दुबई, अबुधाबी, अमेरिका, िब्रटनसारख्या देशांमध्ये गेली अाहे. फेसबुक पेज जगभरातील युजर्ससाठी अाेपन असल्यामुळे काेणीही व्यक्ती त्यात सहभागी हाेऊ शकते. सध्या एक लाख व्यक्ती या पेजशी कनेक्ट झाल्या अाहेत. फेसबुकमध्ये २० हजार कार्यकर्ते सक्रिय आहेत.
मार्क झुकेरबर्गला देणार आमंत्रण
सोशल मीडियातील या सशक्त चळवळीची दखल फेसबुकने घ्यावी अशी या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी थेट फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनाच महाराष्ट्रात आमंत्रित करण्याचा प्रयत्नही मंडळी करत आहेत. त्यांना ई-मेल पाठवून सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...