आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर बाळासाहेब ठाकरेंबद्दल आपत्तीजनक कमेंट करणाऱ्याविरोधात एफआरआय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल फेसबुकवर अपमानजनक टिप्पणी लिहिल्याबद्दल कांदिवली पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात एफआरआय दाखल केला आहे. शिवसेना नेत्यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा एफआरआय नोंदविण्यात आला आहे. 

याबाबत फिर्याद देणाऱ्या लालसिंह राजपूत यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या फेसबुक वॉलवर एका व्यक्तीने बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेबाबत मांडलेल्या भूमिकेवर टिप्पणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अजहर शेख नावाच्या फेसबुक अकाउंटवरुन आपत्तीजनक टिप्पणी करण्यात आली.
 
राजपूत यांच्या म्हणण्यानुसार शेख हा कांदिवली भागातील राहणारा असल्याचे त्यांना समजले आहे. या टिप्पणीमुळे आपल्या भावना दुखावल्या असल्याचे राजपूत यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी कलम 295 (अ) अन्वये एफआयआर दाखल केला असून तपास सुरु केला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...