आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाड्यांचे सोशल नेटवर्क ‘ऑटोबुक’वर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चॅटिंग, शेअरिंग, लाइक्स- डिस्लाइक्स, कमेंट्सच्या दुनियेत आज प्रत्येक कम्युनिटी हरवून गेली आहे. ‘फेसबुक’वरचे हे वाढते प्रेम बघून जर मोटारींनाही सोशली कनेक्टेड व्हावंसं वाटलं तर? तुम्हाला कदाचित चेष्टा वाटेल; पण, खरंच आता मोटारीही ‘सोशल नेटवर्किंग’च्या जगतात प्रवेशकरत्या झाल्या आहेत. यामुळे समस्यांचे आदान-प्रदान होऊ शकेल.

फेसबुकवर मित्र-मैत्रिणींबरोबर आपण कित्येक तास कनेक्टेड असतो तसेच ‘ऑटोबुक’ या येऊ घातलेल्या नव्या सोशल नेटवर्किंग साइटवर मोटारीही कनेक्टेड राहू शकतील. मोटारींना बाहेरच्या बाजूने साजशृंगार चढवून त्यांचे रंगरूप बदलून टाकण्यात वाकबगार असलेल्या ‘क्लासिक स्ट्राइप्स लि.’ या जगातील अग्रेसर कंपनीच्या संकल्पनेतून या अनोख्या सोशल मीडियाची निर्मिती झाली आहे. भारतातून केला जात असलेला या प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.
लाइकऐवजी हॉर्न : ऑटोबुकवर आलेल्या कमेंट्सना लाइकऐवजी आता हॉर्न वाजणार आहे. तुमच्या मोटार किंवा मोटारसायकलींचे प्रोफाइलही तुम्ही तयार करू शकाल.

वाहनप्रेमींसाठी आले खुले व्यासपीठ
ऑटोबुक हे खुले व्यासपीठ आहे. एखादी मोटार जर त्रास देत असेल तर कदाचित तशीच समस्या दुसर्‍याला असू शकेल. तो तुम्हाला उपाययोजना सुचवू शकेल. अनेकदा लोक कार खरेदी करतात, पण त्याच्या तांत्रिक अंगांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना तगडे माध्यम नसते. ते ‘ऑटोबुक’मुळे उपलब्ध होणार आहे.

जागरूकता निर्माण होईल
अधिक मोटारी नेटवर्कमध्ये आल्यास मोठी कम्युनिटी होऊन जागरूकता येईल. ‘क्लासिक स्ट्राइप्स’ स्वत: उपाययोजना सांगणार नाही.’
अमित दाक्षिणी,
सीईओ, क्लासिक स्ट्राइप्स