आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर एक फ्रेड जरुरी नही होता; फेसबुक फ्रेंडने घातला ज्येष्ठ नागरिकाला 2 कोटींचा गंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फेसबुक फ्रेंडने एका ज्येष्ठ नागरिकाला 1.97 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. साइबर क्राइम पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना अनेक बॅंकांमध्ये बनावट पॅनकार्डाद्वारे उघडण्यात आलेल्या 108 बनावट बॅंक खात्यांचीही माहिती मिळाली आहे. 
पोलिसांना यामागे नायजेरियन गॅंगचा हात असल्याचा संशय आहे.
 
वांद्र्यात राहणाऱ्या एका 72 वर्षीय व्यक्तीला त्याच्या फेसबुक फ्रेंडने गंडा घातला. त्यांचा हा फ्रेड आपण अमेरिकेतील असल्याचे सांगत होता. त्याने त्यांना अफगाणिस्तानातील एका गुंतवणूक योजनेविषयी त्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्याला पैसे दिले पण आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
 
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून  मंगल बिश्नोई, अमित अग्रवाल, समीर मर्चेंट उर्फ करण शर्मा, जितेंद्र राठोड, परेश निसबन्द यांना अटक केली. ज्येष्ठ नागरिकाने त्याच्या खात्यावर पैसे जमा केल्यावर त्यांनी ते लगेच काढून घेतले.
 
पोलिसांना तपासादरम्यान या गँगने मुंबई आणि दिल्लीत अनेक बँकांमध्ये बनावट खाती उघडली असल्याचे लक्षात आले. केवायसीचा तपास करताना त्यांनी अनेक ठिकाणी खाते उघडण्यासाठी पॅन कार्डचा वापर केल्याचे उघड झाले. बनावट खात्याचा वापर करत आरोपींनी 108 अकाउंट उघडले होते. ही सर्व बनावट खाती गोठावण्यात आली आहे. या खात्यांमध्ये एक कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. आरोपी एका खात्यावरुन दुसऱ्या खात्यावर पैसे हस्तांतरित करुन काढून घेत होते. पोलिसांना यामागे नायजेरियन गॅँगचा हात असल्याच संशय आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...