आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे अॅम्बी व्हॅलीतील जीवनशैली, महागड्या बंगल्यासोबतच आहे जेट विमानासाठी रनवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅम्बी व्हॅलीतील खासगी रनवे. - Divya Marathi
अॅम्बी व्हॅलीतील खासगी रनवे.
मुंबई/पुणे- सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाच्या पुण्यातील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव रोखण्यास नकार दिला आहे. सहारा समुहाने बुधवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत अॅम्बी व्हॅलीचा लिलाव रोखण्याचे अपिल केले होते. DivyaMarathi.com याच अॅम्बी व्हॅलीबद्दल आपल्या माहिती देत आहे. देशातील पहिली हिल सिटी असणाऱ्या अॅम्बी व्हॅलीची किंमत 39 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
अशी आहे अॅम्बी व्हॅली
- अॅम्बी व्हॅलीत सिनेतारका, खेळाडू, व्हीआयपीचे बंगले आहेत. या ठिकाणी सहाराचा खासगी रनवे देखील आहे.
- सुंदर बगीचे, तलाव अशी लग्झरी लाईफस्टाईल हे सहाराचे वैशिष्टय आहे.
- अॅम्बी व्हॅलीचे क्षेत्र हे 10, 600 एकर आहे.
- येथे वॉटर स्पोर्टस व्यतिरिक्त डर्ट रेस बाइकिंग सुविधा देखील आहे. येथे साहसी क्रीडा प्रकाराच्या सुविधा देखील आहेत. 
- स्काई डाइविंगची सुविधाही येथे आहे. देशातील पहिली सी-प्लेन सेवा येथूनच सुरु झाली होती.
 
कसे पोहचाल अॅम्बी व्हॅलीत
- अॅम्बी व्हॅली लोणावळ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर आहे.
- पुण्यापासून अॅम्बी व्हॅलीचे अंतर 87 किलोमीटर आहे. तर मुंबईपासून हेच अंतर 120 किलोमीटर आहे.
- रस्त्याने या ठिकाणी सहज जाता येते.
 
अॅम्बी व्हॅली घेण्यास कोण आहे तयार
- मॉरिशसची येथील रॉयल पार्टनर्स इन्‍वेस्‍टमेंट फंडने ही अॅम्बी व्हॅली खरेदी करण्यास उत्सुकता दर्शवली आहे.
- कंपनीने यासाठी 10,700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.
बातम्या आणखी आहेत...