आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: नागपुरात फडणवीस-गडकरींचा एकत्रित \'योगा\', मुस्लिम बांधवांची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपुरातील यशवंत स्टेडियमवर रविवारी 21 हजार साधकांनी योगाभ्यास केला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही एकत्रित हजेरी लावली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके, कांचन गडकरी, डॉ. पीयुष कुमार, योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह रामभाऊ खांडवे आदी उपस्थित होते. योगामुळे स्वत: आणि जगाकडे पाहण्याचा व्यापक, उदार आणि सहिष्णू दृष्टिकोन तयार होतो. माणसाला पूर्णत्वाकडे नेणारी ही योग साधना रविवारी हजारो साधकांनी केली. शरीराला आत्मबळासह तणावमुक्त ठेवणारी योग साधना करून सर्वांनी नवीन ऊर्जा मिळवली. मुस्लिम समाजबांधवांनी उपस्थिती लावली होती.
मुख्यमंत्री देवेंद फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते योगासनामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव केला. या वेळी यशवंत स्टेडियम योगमय झाले होते. सकाळी पाच वाजतापासूनच स्टेडियमवर योगसाधक येत होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांतील लोक सहभागी झाले होते. योगाभ्यासी मंडळाचे जनार्दनस्वामी यांनी 1941 मध्ये योग दिन असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. ती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण झाली. आणि भारतीय संस्कृतीची योग साधना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली, अशी भावना रामभाऊ खांडवे यांनी व्यक्त केली.
कैद्यांसाठी जनधन योजना; नागपुरातून सुरुवात- फडणवीस
नागपूर कारागृहातील कैद्यांसाठीही पंतप्रधान जनधन योजना राबवणार असून, त्याची सुरुवात मध्यवर्ती कारागृहापासून सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आंतरराष्ट्रीय योग दिवस जगात साजरा होत असताना राज्यातील कारागृहात योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी दीड महिन्यांपासून तयारी सुरू होती. मध्यवर्ती कारागृहातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता प्रशांत दामले यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर कारागृहाबाहेर बोलताना फडणवीस यांनी कैद्यांसाठी जनधन योजनेची सुरुवात कारागृहापासून झाल्याची माहिती दिली. याशिवाय पंतप्रधान विमा योजनादेखील लागू केली जाणार असून, कैदी कारागृहात असेपर्यंत त्या योजनेचा प्रीमिअम सरकार भरणार आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कारागृहांत कैद्यांकडून रोज एक तास योगाभ्यास करवून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, नागपूरातील फडणवीस-गडकरींच्या 'योग' कसरती...
बातम्या आणखी आहेत...