आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचे अभियान, ‘होय, महाराष्ट्र बदलतोय’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘होय, महाराष्ट्र बदलतोय!’ हे नवे घोषवाक्य आहे फडणवीस सरकारचे पहिले वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्या कामगिरीनिमित्त भाजपतर्फे राबवल्या जात असलेल्या जनसंवाद मोहिमेचे. या मोहिमेत पानवाले, चहा टपरीवाले यांनाच सरकारच्या प्रचारासाठी वापरायची शक्कलही भाजपने लढवली आहे.

३१ ऑक्टोबरला फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त भाजपच्या एका उच्चस्तरीय बैठकीत पक्षातर्फे राबवण्यात येत असलेल्या जनसंवाद मोहिमेला अंतिम रूप देण्यात आले. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’, या प्रभावी प्रचार वाक्यासह भाजपने विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. सरकारला वर्ष पूर्ण होत असताना आता जनतेच्या मनात नेमका हाच प्रश्न आहे. ‘युती सरकारने वर्षभरात राज्याला कुठे नेले?’ या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच 'होय, महाराष्ट्र बदलतोय!' ही ‘टॅगलाइन’ तयार करण्यात आली आहे. वर्षभरात राज्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सरकारने काय काय केले, याची माहिती जनतेला दिली जाणार आहे. जलयुक्त शिवार असो की सेवा हमी कायदा असो किंवा राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी झालेले प्रयत्नांची माहिती जनतेला माहिती दिली जाईल.

सोशल मीडियातूनही सरकारचे यश प्रसारित केले जाणार अहे. राज्यातील ९२ हजार मतदान केंद्रनिहाय ही जनतेशी संवाद साधला जाईल. बुथची जबाबदारी असलेले भाजप कार्यकर्ते जनतेला प्रत्यक्ष भेटून सरकारच्या कामाची पत्रके वाटतील.

पुढे वाचा.. खऱ्या ओपिनियन मेकरची मदत घेणार