मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महायुतीचे मुख्यमंत्री दावेदार असतील, अशी घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. याबाबत पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता,
राऊत यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. मुख्य म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव अद्याप शिवसेनेकडून आलेला नाही. तो आल्यावर त्यावर विचार करता येईल. आताच त्यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात अर्थ नाही, असे फडणवीस म्हणाले.