आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस सरकारचा विस्तार येत्या गुरुवारी? मोदी-शहांच्या होकाराची प्रतिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत दिले. येत्या गुरुवारी ( 3 डिसेंबर रोजी) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे भाजपच्या सूत्रांकडून कळते आहे. भाजपच्या कोअर कमिटीने विस्तार कशा पद्धतीने करायचा एकत्रित निर्णय घेतला आहे. यात शिवसेनेला ठरलेल्या फॉर्म्यूल्यानुसार मंत्रिपद दिली जाणार आहेत. तर मित्रपक्षांनाही सामावून घेण्याचा निर्णय भाजप कोअर कमिटीने घेतला आहे. प्रदेश भाजपने सेना व मित्रपक्षांशी बोलणी केली आहेत. मुंबईतील सर्व घडामोडी पार पडल्या आहेत. आता पक्षश्रेष्ठींकडून ( मोदी-शहा) हिरवा कंदिल मिळताच विस्तार होईल असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज सांगितले.
प्रदेश भाजप मागील तीन-चार दिवसापासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विविध पातळीवर चर्चा करीत आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी व सोमवारी मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर मंगळवारी रात्री व बुधवारी शिवसेनेशी चर्चा केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार कसा असावा व किती लोकांना सामावून घ्यावे याबाबत प्रदेश भाजप कोअर कमिटीत निर्णय झाला आहे. भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे 4 किंवा 5, शिवसेनेचे 2 तर मित्रपक्षांचे 2 किंवा 3 लोक मंत्रिपदाची शपथ घेतील.
विस्तार लांबणीवर पडत चालल्याने शिवसेना नाराज-
भाजपमधील अंतर्गत हेवे-दाव्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. बिहारमध्ये पक्षाच्या पराभवानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या खादीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लागलीच घेण्याची तयारी होती. मात्र, तूर्तास तरी शहांची खुर्ची शाबूत राहणार असल्याचे संकेत मिळताच मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली मंदावल्या. दरम्यान, भाजपमधील घोळामुळे शिवसेना नाराज आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला आधीच खूप उशिर झाला आहे आता आणखी कशाला उशिर करता असा सवाल शिवसेनेचे नेते व उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला विचारला आहे. अनेक लोकांकडे ब-याच खात्याचा कारभार आहे. नव्या चेह-यांना संधी देऊन त्यांच्याकडील भार हलका करावा व जनतेची कामे पूर्वीपेक्षा अधिक वेगानी करावीत असा टोलाही सुभाष देसाई यांनी भाजपला मारला आहे. या सर्व उशिराला भाजप जबाबदार आहे असा थेट हल्लाबोलही देसाई यांनी केला आहे. शिवसेनेच्या दबावाचा भाजपवर काही एक परिणाम होताना दिसत नाही. भाजप आपल्या सोईनेच सर्व गोष्टींना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.