आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस, मुनगंटीवारांकडूनही विदर्भाचे ठराव! विलासरावांनी मात्र केला हाेता विराेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वतंत्र विदर्भावर अशासकीय ठराव अाणण्याच्या मुद्द्यावर विधिमंडळात रणकंदन माजले असताना यापूर्वी राज्य विधानसभेत याच अाशयाचे चार अशासकीय ठराव येऊन गेल्याची चर्चाही हाेत अाहे. विशेष म्हणजे यापैकी एक ठराव खुद्द विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षातील आमदार देवेंद्र फडणवीस यांनीच सन २००४ मध्ये अाणला हाेता. तसेच काँग्रेसचे तत्कालीन आमदार बनवारीलाल पुरोहित व नितीन राऊत यांनी तर भाजपच्या वतीने फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांनी आणलेल्या या विषयाच्या ठरावावर विधानसभेत चर्चा झाली आहे. याशिवाय विजय वडेट्टीवार यांनीही २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात असा ठराव दिला होता, मात्र ऐनवेळेस चर्चा नाकारण्यात अाली हाेती.

१० डिसेंबर २००४ रोजी फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भासाठी मांडलेल्या अशासकीय ठरावावर हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली होती. ‘निधीची कमतरता पडू देणार नाही, हे डायलॉग एेकण्याची आमची इच्छा नाही. वेगळा विदर्भ झाला तर आम्हाला त्याचा फायदा आहे. केंद्रीय कायद्यानुसार ३३ टक्के वनक्षेत्र असेल तेथे वन संरक्षण कायद्याची अडचण येत नाही. विदर्भात यापेक्षा अधिक वन आहे. वन संरक्षण कायदा आडवा आला नाही तर उद्योगांच्या आणि पाटबंधाऱ्याच्या बाबत विदर्भ सुजलाम् सुफलाम् होणार आहे,’ असा प्रभावी युक्तिवादही फडणवीस यांनी तेव्हा केला हाेता. ज्या भाजप खासदार नाना पटोले यांच्या लोकसभेतील अशासकीय ठरावामुळे विदर्भाचा मुद्दा चर्चेत आला, ते पटोले २००४ मध्ये काँग्रेसचे आमदार होते. त्यांनीही या मागणीचे समर्थन केले होते, तर काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी मात्र तेव्हा वेगळ्या विदर्भाला विरोध केला होता. काँग्रेसचे तत्कालीन व विद्यमान आमदार असलेल्या गोपालदास अग्रवाल यांनी मात्र पाठिंबा दिला होता. पश्चिम महाराष्ट्रातील आमदार दिलीप येळगावकर यांनीही ठरावाचे समर्थन केले होते. मात्र, राज्य सरकारच्या वतीने जयंत पाटील यांनी या ठरावाला विरोध केला होता.

मुंडेंचा पाठिंबा, राणेंचा विराेध
२४ जुलै १९९८ रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी ठराव आणला. काँग्रेसचे नितीन राऊत यांनी १५ डिसेंबर २००० रोजी ठराव मांडला. गोपीनाथ मुंडेंनी त्याचे समर्थन केले तर तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी विराेध केला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ठरावाला विरोध केला होता.

पहिला ठराव पुराेहितांचा
विदर्भाबाबत पहिला अशासकीय ठराव काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित यांनी १५ मार्च १९७९ मध्ये मांडला. राज्यात तेव्हा पुलोद सरकार होते. या ठरावाचेही तेव्हा बहुसंख्य सर्वपक्षीय वैदर्भीय आमदारांनी समर्थन केले होते, तर गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांनी मात्र विराेध केला हाेता.
बातम्या आणखी आहेत...