आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fainace Ministry Regected Bajrang Bhaijans Director Demands

बजरंगी भाईजान चित्रपट टॅक्स फ्री होणार नाहीच, अर्थखात्याने फेटा‌ळली मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमामधून भारत- पाकिस्तानचा सीमाप्रश्न, दोन्हीकडची संस्कृती आणि माणुसकी या सगळ्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यामुळे हा सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सरकारकडून ही मागणी फेटाळण्यात आली. टॅक्स फ्री सिनेमाच्या निकषात हा सिनेमा बसत नसल्याने बजरंगी भाईजानला ही सवलत देता येणार नाही, असे अर्थ विभागाने स्पष्ट केले आहे.

नफा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार
हा चित्रपट सरकारने टॅक्स फ्री देण्यास नकार दिला असला तरी आता या सिनेमाला मिळालेला नफा दुष्काळी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय या सिनेमाच्या टीमने घेतला आहे. सलमान खान व त्यांच्या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपताना ‘बिईंग ह्युमन’ ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजूंना गेली अनेक वर्षे मदत केली जाते.