आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र आव्हांडाच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून मराठी अभिनेत्रीला अश्लिल मॅसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बनवलेले बनावट फेसबुक खाते.... याच खात्यांवर मॅसेज पाठवले आहेत. - Divya Marathi
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बनवलेले बनावट फेसबुक खाते.... याच खात्यांवर मॅसेज पाठवले आहेत.
मुंबई- ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केल्याचे पुढे आले. याबाबत स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केली नाही. पोलिसांनी बनावट फेसबुक खाते उघडून त्याचा चुकीचा वापर करणा-यांचा शोध आणि तपास सुरु केला आहे. 
 
जितेंद्र आव्हाडांनी याबाबत सांगितले की, माझ्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक खाते उघडले होते. ते खाते कधीपासून कार्यरत आहे याची माहिती मला माहित नाही. मात्र, नुकतेच त्या खात्यावरून एका मराठी अभिनेत्रीला अश्लिल चॅटिंगसह मॅसेज पाठवले गेले. त्यानंतर संबंधित अभिनेत्रीने एका मित्राद्वारे याबाबत माझ्याकडे विचारणा केली. मात्र, आपण असे कोणतेही मॅसेज केले नाहीत याची माहिती दिली. यानंतर संबंधित फेसबुक खाते तपासण्यास सांगितले असता ते खाते बनावट निघाले. 
 
यानंतर, जितेंद्र आव्हानांनी बनावट फेसबुक खाते तयार करून त्याचा चुकीचा वापर केल्याच्या विरोधात अज्ञाताविरोधात ठाणे पोलिसांत तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. हे प्रकरण सायबर क्राईमशी संबंधित असून, हे खाते कोणी, कधी व कोणत्या आयपी अॅड्रेसवरून बनवला याचा शोध घ्यावा लागेल असे सांगितले. हे प्रकरण सायबर क्राईम विभागाकडे सोपविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...