आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famers Suicide Prevention Responsibility On Secretary

शेतकरी अात्महत्या राेखण्याची जबाबदारी आता थेट सचिवांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त आणि आत्महत्याप्रवण क्षेत्रास विशेष मदतीसाठी जिल्ह्यांतील प्रत्येक उपविभागासाठी सचिव दर्जाचा एक अधिकारी नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. भविष्यात या जिल्ह्यात आत्महत्या झाल्यास या सचिवांनाच अप्रत्यक्षरीत्या जबाबदार धरण्यात येणार असून आत्महत्या का टाळता आली नाही, याची कारणे स्पष्ट करणारा अहवाल त्यांना द्यावा लागेल.

योजना राबवण्यासाठी जिल्ह्यांपुरते प्रशासकीय विभागांच्या सचिवांचे अधिकार या सचिवांना आहेत. उणिवा दूर करण्यासाठी शासन निर्णयांत ते बदलही करू शकतील. उपविभागात पंधरवड्यात एक दिवस मुक्काम करून कामांच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्र्यांना सादर करावा लागेल. जलयुक्त शिवारची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारीही अाहे.

कर्जाचे पुनर्गठन, माफी, मालाला बाजारपेठ
अधिका-यांच्या जबाबदा-या अशा- आत्महत्याग्रस्त व प्रवण भागांच्या सर्वेक्षणानंतर कुटुंबांना शासकीय मदत उपलब्ध करणे, गावातील सार्वजनिक मंडळांच्या मदतीने शेतक-यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे, योजनांचा लाभ पोहोचवणे, कर्ज पुनर्गठन, माफी, शेतमालाला बाजारपेठ, भाव मिळवून देणे, व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाची सुविधा देणे.

उस्मानाबाद जिल्हा
उस्मानाबाद : राजेश मीना
कळंब : मुकेश खुल्लर
भूम : बिजॉय कुमार
उमरगा : सुनील पोरवाल

यवतमाळ जिल्हा
यवतमाळ : डी.के. जैन
दारव्हा : व्ही. गिरिराज
राळेगाव : विकास खारगे
पुसद : महेश पाठक
उमरखेड : राजगोपाल देवरा
वणी : मालिनी शंकर
केळापूर : प्रभाकर देशमुख