आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोट मिळविण्यासाठी पतीची अशी ही \'व्यापारी\' शक्कल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील गिरगाव परिसरातील एका व्यापा-याला आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा होता. मात्र, कोर्ट सहजासहजी घटस्फोट मंजूर करणार नाही व त्यासाठी पत्नीला पोटगीच्या रूपाने मोठा मोबादला द्यावा लागेल यासाठी या व्यापा-याने येथेही एक 'व्यापारी' शक्कल लावली. त्यात तो यशस्वीही ठरला. मात्र, कौटुंबिक कोर्टाकडे जेव्हा हा खटला गेला तेव्हा पतीचे पितळ उघड पडले. व्यापा-याचे पितळ उघडे पडल्याने त्याच्यासह आणखी तिघांना आता गजाआड जावे लागले आहे.
याबाबतची घटना अशी की, सुजाता (नाव बदलले आहे, वय 33)चा 2004 साली गिरगावमधील व्यापारी महेश मेहताशी विवाह झाला होता. व्यापरी महेशचे पुढील काळात पत्नीशी वाद होऊ लागले. त्यानंतर या महेशने 2008 साली वांद्रेतील कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सध्या या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. याचसाठी मागील काही वर्षापासून पत्नी सुजाताही कोर्ट वा-या करीत होती. याचदरम्यान सुजाताची सुनील तिवारी नावाच्या माणसाची ओळख झाली. नव्हे सुनीलनेच ती ओळख वाढवली. याप्रकरणात मदत करतो असे सांगितले. त्यामुळे सुनील व सुजाता एकमेंकांच्या संपर्कात होते. काही महिन्यांनी सुनीलने मी तुझ्याशी लग्न करतो लवकर घटस्फोट घे असे सुजाताला सांगितले. सुजाताने त्याला घटस्फोटानंतर याचा विचार करू असे म्हणत अप्रत्यक्षरित्या होकार दिला. मात्र, दोघे जवळ आल्याने त्यांच्याच शारीरिक संबंध जुळले.
पुढे वाचा, कशी फसगत झाली सुजाताची...