मुंबई- पतीची नपुंसकता एका प्रकारची मानसिक क्रुरताच आहे असे निरीक्षण नोंदवत मुंबईतील एका कौटुंबिक कोर्टाने मालाडमधील एका महिलेचा घटस्फोट मंजूर केला आहे. तसेच भविष्यासाठी तिच्या देखभालीसाठी खर्च देण्याचाही आदेश देण्यात आला आहे.
जर पती नंपुसक असेल आणि विवाह पूर्णत्वास गेला नसेल तर पत्नीसाठी ही एक प्रकारची क्रुरताच आहे तसा कायदाच आहे. या कारणास्तव पत्नीला विभक्त राहण्याचा अधिकार आहे. तसेच ती देखभालीचा खरच मिळण्यासाठी दावाही करू शकते, असे कौटुंबिक कोर्टाने एकै 19 वर्षीय विवाहित युवतीला तिच्या पतीपासून घटस्फोट देताना म्हटले आहे.
महिलेला दरमहा 3500 रूपये देखभालीचा खर्च म्हणून देण्याचे निर्देश देत कोर्टाने पतीला थकीत अशी 77 हजाराची रक्कम देण्यास सांगितले आहे. याबाबतची माहिती अशी की, संबंधित युवती गृहिणी असून, गेल्या 6 फेब्रुवारीला तिने कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तिचा मे 2010 मध्ये विवाह झाला होता. मात्र पती नपुंसक असल्याने या दोघांचा विवाह पूर्णत्वास जाऊ शकला नाही. या युवतीने तिच्या नणंदेकडून याची खात्री करून घेत तिची मदत मागितली. याबाबच तिच्या वडिलांनाही सांगितले. वडिलांनी यावर उपचार करण्यासाठी औषधोपचार केले. सर्व प्रयत्न व्यर्थ गेल्याने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला.