आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब नियोजन अपयशी; दोन लाखांची भरपाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उद्भवणारी गुंतागुंत, मृत्यू किंवा अपयश आल्यास यापुढे संबंधितांना कुटुंब नियोजन विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

ग्रामीण भागातील कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सरकारी रुग्णालये, दवाखान्यांमध्ये होणार्‍या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत नुकसानभरपाई देण्याबाबतचा आदेश दोन दिवसांपूर्वी काढला असून एप्रिल महिन्यापासून पूर्वलक्षी प्रभावाने तो लागू होईल. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अपयशी झाल्याची उदाहरणे फारच कमी आहेत. मात्र, तरीही सावधगिरीची उपाययोजना म्हणून एक प्रकारे विम्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले.

महिला, पुरुषांच्या शस्त्रक्रियेचा समावेश
सरकारी रुग्णालयांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्यास किंवा रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर सात दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये भरपाई दिली जाईल.

शस्त्रक्रियेनंतर डिस्चार्ज दिल्याच्या तारखेपासून आठ ते 30 दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास 50 हजार रुपये तर शस्त्रक्रिया अपयशी झाल्यास 30 हजार रुपये मिळतील.

ही शस्त्रक्रिया करताना गुंतागुंत झाल्यास किंवा त्यानंतर 60 दिवसांनी गुंतागुंत झाल्यास 25 हजार रुपये या योजनेअंतर्गत देण्यात येतील.

एमबीबीएसची पदवी असणार्‍या व पाच वर्षांचा अनुभव असलेल्या डॉक्टरांनाच ही शस्त्रक्रिया करता येईल."

एमबीबीएस पदवीसह स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञविषयक पदविकाधारक, पदवीधारक आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेतलेल्यांनाच ही शस्त्रक्रिया करता येईल.

मिनीलॅप पद्धतीने महिलांची नसबंदी, पारंपरिक स्वरूपाची पुरुष नसबंदी आणि बिनटाक्याची पुरुष नसबंदी यांचा या विमा योजनेत समावेश आहे.

केंद्राच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत योजना राबवणार