आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची घरात घुसून हत्या, पत्नीवर केला हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नालासोपारा परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. अली असगर भानपुरवाला असे मृत व्यक्तीचे नाव ते रिलायबल कंपनीचे मालक होते.
जोगेश्वरीतील ओशिवरामध्ये भानपुरवाला यांच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी ही हत्या करण्यात आली. मारेकर्‍याने भानपुरवाला यांच्या पत्नीवरही हल्ला केला आहे. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेली माहिती अशी की, आरोपी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास बुरखा घालून भानपूरवाला यांच्या घरात घुसला. आरोपीने भानपूरवाला यांच्यासह त्याच्या पत्नीवर हल्ला केला.  यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे आहे. भानपूरवाला यांना हॉस्पिटलमध्ये नेताना मृत्यू झाला.

मारेकरी भानपूरवाला यांच्या पत्नीचा पहिला पती?
भानपूरवाला यांचा मारेकरी त्यांच्या पत्नीचा पहिला पती असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना वर्तवला आहे. आरोपी फरार असून पो‍‍लिस आणि क्राईम बँच आरोपीचा शोध घेत आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...