आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींना टि्वटरवर उत्तर दिल्याने ट्रोल झाली ही ज्वेलरी डिझायनर, काय म्हणाली असं...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय खानची मुलगी फराह अली खान... - Divya Marathi
संजय खानची मुलगी फराह अली खान...

मुंबई- फेमस ज्वेलरी डिझायनर फराह खान अली आपल्या एका ट्विटमुळे ट्विटरवर ट्रोल होत आहे. पीएम नरेंद्र मोदींनी ट्विट केले होते की, काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे की लोकांना आपापसात विभागणे आणि केवळ विरोधासाठी विरोध करणे. फराह खानने यावर मोदींच्या टि्वटला उत्तर दिले की, भाजप सुद्धा असेच काहीसे करते. या ट्विटनंतर सोशल मीडियात अनेक लोकांनी तिच्यावर निशाणा साधला. फराहच्या या या ट्विटला शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुद्धा लाईक केले आहे. ​फराहने ट्विटमध्ये काय लिहले....

 

- आपले म्हणणे बेधडकपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फराहने पीएम मोदीच्या ट्विटला उत्तर देताना लिहले की, माफी मागून मला म्हणावसे वाटते की, तुमचा भाजप पक्ष सुद्धा असेच काहीसे करतो. भाजपसुद्धा धर्म, जाती आणि धार्मिक आधारावर राजकारण करतो. तुम्हाला नाही वाटत की, दोन्ही पक्ष एकाच मुद्यांवर भांडताना दिसत आहेत.
- फराहला यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळू लागल्या. शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही फराहच्या या उत्तराला लाईक केले.
- ट्विटरवर ट्रोल झालेली हायप्रोफाईल ज्वेलरी डिझायनर फराह खानने सायंकाळी आणखी एक ट्विट केले. त्यात त्यांनी लिहले की, राजकीय पक्ष धार्मिक श्रद्धावर विश्वास ठेऊन पक्षाचे अध्यक्षपदाचे नामांकन भरणे, पूअर कार्डपासून ते धु्व्रीकरणाच्या राजकारणापर्यंत, फिल्म बॅन करण्यापासून ते गळा काटण्याची धमकी देण्यापर्यंतचे मुद्दे उठवत असतात. आपण शिक्षण, रोजगार, शेतकरी यासारखे रियल इश्यूज ऊठवायला पाहिजे.
- शेवटी फराहने लिहले की, आम्ही विकासासाठी मतदान केले होते पण शेवटी सर्व काही बकवास ठरताना दिसत आहे. 
- फराहच्या या ट्विटवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोकांच्या ती निशाण्यावर आली. काहींनी तिच्याबाबत वाईट कमेंट केल्या.

 

कोण आहे फराह खान?

 

- फराह खान ही अॅक्टर, प्रोड्यूसर आणि डायरेक्टर संजय खानची मुलगी आहे. तिची आई झरीन खान एक इंटिरियर डिझायनर आहे.
- फेमस डीजे अकीलची पत्नी फराह खानने आपली पदवी मुंबईतील फेमस सोफिया कॉलेजमधून घेतली. ज्वेलरी डिझाईन सोबतच फराहने इंटिरियर डिझाईन आणि टेलीविजन प्रॉडक्शनमध्ये अॅडमध्ये सुद्धा काम केले आहे.
- याशिवाय फराहने अमेरिकेतील फेमस 'जेमोलॉजिकल इंस्टिट्यूट ऑफ अमेरिका' मधून जेमोलॉजीत डिग्री घेतली आहे.
- फराहने आपला स्वत:चा ज्वेलरी ब्रॅंड 'फराह खान फाईन ज्वेलरी' वर्ष 2004 मध्ये लाँच केला होता. तिने हा ब्रॅंड इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा लाँच केला होता.
- ज्वेलरी डिझायनिंगमध्ये फराहला अर्धा डझनहून अधिक नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर अवार्ड मिळाले आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फराहचे काही फोटोज आणि तिचे ट्विट....

बातम्या आणखी आहेत...