आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे खरिपाच्या लागवडीस वेग आला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यंदाच्या खरीप हंगामामध्ये तांदूळ अाणि डाळींच्या लागवडीमध्ये लक्षणीय वाढ झाली अाहे. मान्सूनच्या पुढच्या प्रगतीवर या पिकांचे भवितव्य अवलंबून असेल. तेलबिया पिकांच्या लागवडीमध्ये सुधारणा झालेली असली तरी ऊस, कापूस अाणि ज्यूटसारख्या नगदी पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र कमी असल्याचे कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अाकडेवारीमध्ये म्हटले अाहे.

जूनमध्ये पावसाला प्रारंभ झाल्यापासून खरिपातील पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या अाहेत. सध्या सरासरीपेक्षा ११ टक्के जास्त पाऊस झाला अाहे. जूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता अाहे, परंतु त्यानंतरच्या महिन्यात पावसाचे प्रमाण कमी हाेईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला अाहे.
लागवडीला वेग
पावसाची प्रगती चांगली हाेत असल्याने डाळी अाणि अन्य खरीप पिकांच्या लागवडीला वेग येईल. त्याचप्रमाणे स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने डाळींसाठी सर्वाधिक हमी भाव दिला असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...