मुंबई - नैसर्गिक संकटात पिकांच्या नुकसानीसाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करून केंद्राने ती ३३ टक्के केली. केंद्राच्या याच नव्या निकषानुसार राज्यातील
आपत्तीग्रस्त शेतक-यांना मदत देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत झाला. केंद्राने शेतक-यांना २०१५ ते २० या काळासाठी भरपाईचे निकष व मदतीच्या दरात सुधारणा केली आहे.
नैसर्गिक आपत्ती : चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी आणि कडाक्याची थंडी, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, समुद्राचे उधाण व वीज कोसळणे आदी.