आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ पुन्हा अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी एंटी करप्शन ब्यूरोने (एसीबी) भुजबळांसह 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळांचाही समावेश आहे.

अधिकाराचा गैरवापर करत भुजबळ यांनी आपल्या नातेवाइकांच्या कंपनीला महाराष्‍ट्र सदनाच्या कामाचे कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. समीर भुजबळ आणि पंकज भूजबळ हे दोघे प्रवेश कन्स्ट्रक्शन आणि बावेश कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत.
याआधी मुंबईतल्या कलिना भागातील जमीन अवैधरित्या बिल्डराच्या घशात घातल्याप्रकरणी भुजबळांवर गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. भुजबळ यांच्यावर एका आठवड्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

दुसरीकडे, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळ आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. भुजबळ आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात सबळ पुरावे असतील तर गुन्हा दाखल करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी दिले होते. दमानिया यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे आदेश दिले होते. परंतु, एसीबीने याप्रकरणाचा सखोल तपास करण्‍यासाठी कोर्टाकडे आणखी वेळ मागितला आहे. या प्रकरणी एसीबीला 18 जूनपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.