आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer State Minister Vijaykumar Gavit Illegal Assent News In Marathi

विजयकुमार गावित यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी १५ दिवसांत निर्णय घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालावर १५ दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत विभागाच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

विजयकुमार गावित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विराेधातील या प्रकरणाच्या तपासासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते व्ही.आर.मुसळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती एन.एच.पाटील आणि व्ही.एल अांचलिया यांच्या पीठाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणात लाचलुचपत खात्याच्या चौकशी समितीने गावित आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करून त्यासंबंधीचा अहवाल महासंचालकांकडे सुपूर्द केला आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर गावित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा की नाही, याचा निर्णय महासंचालकांनी घ्यावा. मात्र, तो निर्णय आगामी पंधरा दिवसांच्या आतच घ्यावा, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
आयकर विभागाने गावित आणि त्यांच्या कुटुंबीयांचे २००७-०८ पासूनचे उत्पन्न, संपत्ती तसेच अन्य बाबींचा तपशील पुनर्मूल्यांकनास घेतला आहे. आयकराशी निगडित अन्य बाबींवर योग्य कारवाईसाठी नाशिकचे आयकर आयुक्त लक्ष देतील, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, लाचलुचपत विभागाला त्यांच्या चौकशी समितीकडून गावित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी संपत्तीबाबत माहिती आढळून आली होती. त्यावरून त्यांना सरकारने विजयकुमार गावित यांच्या खुल्या चौकशीस परवानगी दिली होती.